पुणे : विद्येच्या माहेरघरात काय चाललंय असाच प्रश्न तुम्हाला ही बातमी पाहून पडेल. बिबवेवाडीतील पुण्याच्या क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरने पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. फी भरण्याच्या वादावरून प्रिन्सिपलनेच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि प्रिन्सिपल यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली. पालकांना शाळेतच मारहाण झाल्याने खळबळ उडाली आहे.


मयुरेश गायकवाड यांनी याप्रकरणी तक्रार केली असून, बिबेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


या प्रकरणावर मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया 



मागील ३ वर्षांचा फी पालकांनी भरलेली नाही. पालक गेल्या ३ वर्षांपासून त्रास दिल्याचा आरोप देखील मुख्याध्यापकांनी लावला आहे. ७० टक्के पालकांनी अद्याप शाळेची फी भरलेली नाही, असा आरोप मेमोरिअल शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सिंह यांनी पालकांवर केलेला आहे. 


काय आहे प्रकरण?


फी भरण्याच्या वादावरून मुख्याध्यापकांनीच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि मुख्याध्यापक यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली.


पालकांना शाळेतच मारहाण झाल्याने ही घटना नेमकी किती गंभीर आहे हे कळत आहे. सर्वांना धक्का देणाऱ्या या घटनेप्रकरणी मयुरेश गायकवाड यांनी तक्रार केली असून, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


पालक फक्त निवेदन करण्यासाठी शाळेत आले होते. कोरोना संकटांमुळे त्रस्त पालकांनी फीसंदर्भात शाळेनं दिलासा देण्यासाठीचं निवेदन करण्यासाठी शाळेची वाट धरली. 


पण, पालकांचं काहीही न ऐकून घेता मुख्याध्यापकांनी थेट बाऊंसर अंगावर सोडले अशी प्रतिक्रिया काही पालकांनी दिली. मुळात शाळेसाठी बाऊंसर ही संकल्पनाच पूर्णपणे चुकीची असल्याचा सूरही काही पालकांनी आळवला. 


हा काही पब आहे का, लहान मुलांच्या एका संस्थेमध्ये बाऊंसर कोण ठेवतं असा संतप्त सवाल काहींनी केला. कायद्याच्या मार्गानं फी बाबत दिलासा देण्यासाठी पालक आर्जव करताना शालेय प्रशासनाची अशी वागणूक आक्षेपार्ह असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी म्हटलं.